मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे नारायणगावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध

किरण वाजगे, नारायणगाव

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अनुद्गार काढल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ आज नारायणगाव बस स्थानकाजवळ जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे व्यंगचित्र फ्लेक्स बोर्ड वर छापून त्यांचा अनोखा निषेध व्यक्त करण्यात आला. या फ्लेक्स बोर्ड वर काळी शाई टाकून जोडे मारण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार शरद सोनवणे, माजी उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे. जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, शरद चौधरी, उपतालुकाप्रमुख रशिद इनामदार, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, शहर प्रमुख संतोष वाजगे, अनिल खैरे, सरपंच महेश शेळके, युवा सेनेचे पदाधिकारी विकी पारखे, निलेश चव्हाण, शोभा पाचपुते, सह्याद्री भिसे, गौतम औटी, अभय वाव्हळ, योगेश बागुल, ग्रामपंचायत सदस्य राजेश बाब्ते, आरिफ आतार, गणेश पाटे, हेमंत कोल्हे, मोहन बांगर, तौसिफ कुरेशी तसेच अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नारायण राणे यांचा निषेध करताना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे म्हणाले की, भाजप पक्षाबद्दल सर्व स्तरावर तडजोड होताना दिसत असून शिवसेनेचे वजन आता शंभर टक्के वाढले असून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे हे असं अभद्र बोलायला लागले आहेत. या वेळी सरपंच योगेश पाटे यांनी नारायण राणे नी जुन्नर तालुक्यात येऊन दाखवावे असे आवाहन केले.

यावेळी माजी उप जिल्हाप्रमुख संभाजी तांबे यांनी देखील शेलक्या भाषेमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका केली असून हऱ्या नाऱ्या ची जोडी मुंबईमध्ये कोंबडी चोर म्हणून प्रसिद्ध होती त्यांची लायकी नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची…!
याप्रसंगी शरद चौधरी, रशिद इनामदार, बाळासाहेब पाटे आदींनी तीव्र शब्दात नारायण राणे यांचा निषेध केला. यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशन च्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleकृष्णागी खांडेभराड हिच्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ म्हाळगी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleजनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून – जलसंपदा मंत्री जयंत पाटील