महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला सर्व सामान्य माणसाचा आमदार ॲड अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरूर-हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार म्हणजे अत्यंत अभ्यासू, कार्यकुशल, सक्षम आणि नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व. वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला सक्षम वारसा पुढे चालवताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने कार्य करणारे आमदार अशोक पवार हे २००९ ते २०१४ पर्यंत शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार होते तसेच २०१९च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सुमारे ४१,००० मताधिक्याने विजयी होऊन ते शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते स्वतः एक वकील असून त्यांचा कायदे, समाजकारण, राजकारण याचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे राजकारणात मोठे यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या प्रतिभा आरोग्य मंदिराचे (कोविड केअर सेंटर) कौतुक झाले. प्रत्येकाला हेवा वाटावा असे आरोग्य मंदिर उभारून ज्यांनी एकही रुग्ण गंभीर होऊ दिला नाही. हजारो कुटुंब कोरोनामुक्त करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे, एकाच वेळी ५ भव्य सेंटर्स उभी करून आरोग्यदूताचे कार्य करणारे, मतदारसंघात ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणी संदर्भात आग्रही भूमिका घेणारे, जिथे बाधित रुग्णांना नातेवाईक भेटत नव्हते तिथे स्वतः भेट घेऊन आपुलकीने विचारपूस करणारे. आमदार अशोकबापू यांनी खऱ्या अर्थाने तालुक्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे.

अशोक बापूंनी उभारलेल्या आरोग्य मंदिरामधील सुविधा बघून पुण्यातील लोक देखील तिथली व्यवस्था सोडून खेड्यातील या ठिकाणी येऊ लागली. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला काही धडे दिले त्यापैकी एक म्हणजे आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा. ज्या देश, राज्य, शहराने या काळात आपल्या आरोग्य व्यवस्थेला सुधारण्याचा प्रयत्न केला त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आमदार अशोक बापूंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य व्यवस्था सक्रियपणे काम करीत होती. तालुक्यातील नागरिकांना या काळात आरोग्य सुविधांचा अभाव जाणवू नये म्हणून त्यांनी स्वतः प्रतिभा आरोग्य मंदिरे उभारून (कोविड केअर सेंटर) जनतेला दिलासा देण्याचे काम केले.कोविड केअर सेंटर मधील रुग्णांची कुठलीच गैरसोय होऊ नये म्हणून नेहमी दक्षता घेणाऱ्या कार्यसम्राट आमदार अशोक पवार मुळे तालुक्यात कोरोना नियंत्रणात आला. सतत नागरिकांच्या आरोग्याची काळजी करत आमदार पवार त्या दृष्टीने कार्य करीत असतात. येणाऱ्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून मतदार संघात ऑक्सिजन प्लांट उभारणी व्हावी या दृष्टीने देखील त्यांनी काम सुरू केले आहे.

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सतत आधार देण्याचं काम बापूंनी केलं. आणि या कार्यात त्यांना साथ दिली ती सौभाग्यवती सुजाता भाभींनी.स्वतः च आयुष्य विसरून जनसेवेचे व्रत घेतलेल्या भाभींनी मागील दीड वर्षांपासून तालुक्यातील रुग्णांना आणि योद्ध्यांना दिलेली आपुकीची साथ कौतुकास्पद आहे.

‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून शिरूर हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार आणि सुजाता पवार यांनी कर्तव्य भावनेतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मतदारसंघातील नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी भरभरून मदत केली.

पूरस्थितीमुळे तेथील बांधवांचा उघड्यावर आलेला संसार सावरण्यासाठी शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांनी मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला तब्बल ४९ प्रकारच्या संसार उपयोगी वस्तू दिल्या.
या अभियानामध्ये सुमारे 10000 कुटुंबांचा संसार सावरण्याचा प्रयत्न केला.

या सर्वात मोठ्या मदत अभियानाची दखल स्वतः खासदार सुप्रिया घेतली. माध्यमांनी सुद्धा या कार्याचा गौरव केला. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद

हत्तीची चाल, वजिराचा रुबाब असं म्हणत अशोक पवारांसारख्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सोशल मीडिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

Previous articleराष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ म्हाळगी विद्यालयाचे ५ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक  
Next articleसहिंद्र भावले यांची मास्टर्स गेम्स् असोसिएशन पुणे अध्यक्षपदी निवड