गरीबांना न्याय देण्यासाठी गावातील पुढा-यांनी पुढे येऊन काम करावे- आमदार राहुल कुल

अमोल भोसले,उरुळी कांचन

पाटस गाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. नंतर तलाठी कार्यालय पाटस येथे आदिवासी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या खावटी वाटप या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या उपस्थितीत खावटी वाटप करण्यात आले.
आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांच्याकडून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या चार जिल्हातील गरीब कुटुंबातील लोकांसाठी एकुण 13682 बाजाराचे किट वाटप करण्याचे आयोजीत केले आहे.

सदर त्या अनुशंगाने आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे व अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पाटस गावातील तलाठी व सरकल आॅफीस येथे दौंडचे आमदार राहुल कुल व आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, पि.एस. आय.नागरगोजे, नामदेव शितोळे, डाॅ. मधुकर आव्हाड, योगेश शितोळे, संभाजीराव खडके, यांच्या उपस्थितीत आदिवासी पारधी गरीब कुटुंबातील लोकांना किट वाटप करण्यात आले.

आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्यात कोरोणामुळे गरीबांची उपासमार होऊ नाही, त्यामुळे गरीबांना खावटी अनुदान योजणे अतंर्गत खावटी वाटप केली जात आहे. परंतू शासनाने वर्षातून एक किट देण्या ऐवजी दर महिन्याला एक द्यावे अशी तरतूत शासनाने करावी तरच गरीबांना खरा न्याय मिळेल, राज्यात आदिवासी पारधी कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यात नामदेव भोसले हे नेहमीच अग्रेसर असतात, नामदेव भोसले हे एक दिवस आदिवासी पारधी समाजाचा कलंक पुसून काढतील असा मला विश्वास आहे. आज आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत परंतू, आपण एक पाऊल पुढे होऊन शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहीजे ते पुढे म्हणाले की गावातील गावपुढा-यांनी आपल्या गरीबील पुढाऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे यावे असे आव्हान आमदार राहुल कुल यांनी केले.

या वेळी आमदार मा.राहुल कुल, साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, डाॅ. मधुकर आव्हाड, योगेंद्र शितोळे, नामदेव शितोळे, संभाजीराव खडके, दादासाहेब भंडलकर, केसकर पानसरे, जयवंत शितोळे, संभाजी देशमुख, वसंत साळुंखे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, रामदास चव्हाण, माणिक चोरमले, बाबा कोळेकर ,विकास कोळपे, मंडल अधिकारी भोंडवे,भाऊसाहेब तलाठी पाटस, अभिजीत शितोळे, सतिश आव्हाड, विठ्ठल आव्हाड, आशोक पानसरे व आदिवासी कुटुंबातील लाभार्थी मोठ्या संख्येत उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकरराव आव्हाड यांनी केले व योगेंद्र शितोळे यांनी आभार मानले.

Previous articleन्यू अमर टायर्सचे जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते उद्घाटन
Next articleवैद्यकीय सेवे डॉ रवींद्र भोळे यांचे काम आदर्श – नंदकुमार मुरकुटे