न्यू अमर टायर्सचे जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते उद्घाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

धावपळीच्या जीवनात ग्राहकांना चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, कृषी, व्यवसायीक क्षेत्रात टिळेकर परिवाराचे काम आदर्श असल्याचे मत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन यांनी व्यक्त केले. न्यू अमर टायर्स शोरुमचे उदघाटन पंचक्रोशीतील २१ जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी कांचन बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र शासनाचे माजी कृषी अधिकारी संजय टिळेकर यांनी केले.

यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष – जातेगाव श्रीदत्त मंदिराचे संचालक महंत संदीप दिवाकर बाबा, सरपंच संतोष कांचन, जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य महादेव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, माजी संचालक राजाराम कांचन, हवेली ता.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, आबासाहेब कांचन, डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, संगिता टिळेकर, सदाशिव टिळेकर, रा.कॉ.ओबीसीचे तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, रा.कॉ.जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साठे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग भोसले, भाजपचे व्यापारी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास जगताप, माजी सरपंच मारुती थोरात, माजी उपसरपंच सुनिल गोते, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, श्रीकृष्ण फर्निचरचे हरिभाऊ कांचन, पोपट महाडिक, सुरेश सातव, भाऊसाहेब कांचन, डॉ मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, सोमनाथ कोतवाल, माजी प्राचार्य देविदास टिळेकर, संतोष टिळेकर, आबासाहेब टिळेकर आदी उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्य दिनानिमित्ताने मतदान नोंदणी अभियान शिबिराचे उदघाटन
Next articleगरीबांना न्याय देण्यासाठी गावातील पुढा-यांनी पुढे येऊन काम करावे- आमदार राहुल कुल