स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मतदान नोंदणी अभियान शिबिराचे उदघाटन

दिनेश पवार,दौंड

पोलीस मित्र संघ ड्रिम्स निवारा व रमाई सेवा संघ कोरेगाव मुळ यांच्या विद्यमाने यांच्या मतदान नोंदणी व पॅनकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच शालेय मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धां घेण्यात आली.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कोरेगाव मुळ गावचे सरपंच विठ्ठल नाना शितोळे, उपसरपंच मनीषा कड , ग्रामपंचायत सदस्य दत्ताञय काकडे,वैशाली अमीत सावंत, भानुदास जेधे,लिलावती बापूसाहेब बोधे, राधिका काकडे, सचिन निकाळजे,मंगल पवार, बापूसाहेब बोधे ,अश्विनी कड, महाराष्ट्र राज्य पोलीस संघांचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर साहेब, केसरीचे पञकार अमोल भोसले रमाई सेवा संघाचे अध्यक्ष रविंद्र गायकवाड, पोलीस मित्र संघ ड्रिम्स निवारा शाखा अध्यक्षा आरती मुन मॅडम, उपाध्यक्ष सुगत कांबळे, कविता टोळे, प्रसिद्धी प्रमुख मनीषा कुंभार,सुनीता चव्हाण ,सारिका जगताप प्रवक्ते मा.अश्विन मुन , बौध्दाचार्य विष्णुजी कांबळे सचिव संजय साळवे, खजिनदार शंकर अहिवळे, सह खजिनदार अमोल गजरमल, सहसचीव अतुल वाघमारे, कार्यध्यक्ष परमेश्वर सावंत,वंचीत आघाडी पुणे शहर जिल्हा महिला उपाध्यक्ष मालती बडेकर मॅडम महासचीव प्रिया लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर शिबिरामध्ये ८० लाभाथीॕ लोकांनी मतदान व पॕन कार्ड नोंदणी शिबिराचा लाभ घेतला.

चित्रकला स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांचे सन्मान चिन्ह व प्रमाणपञ देऊन सन्मान करण्यात आला. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक मा. प्रा डॉ खिलारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गायकवाड यांनी केले.सुञसंचालन अश्विन मुन यांनी केले तर आभार आरती मुन यांनी मानले.

Previous articleखेड येथील पप्पू वाडेकर व मंचर येथील राण्या उर्फ ओमकार बाणखेले यांच्या खुनातील आरोपी पवन थोरात याला अटक
Next articleन्यू अमर टायर्सचे जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते उद्घाटन