स्पार्क मिंडा फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत दोंदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण

राजगुरूनगर- ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पार्क मिंडा फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत दोंदे यांच्या संयुक्त विद्यमाने सुकाळे स्थळ येथील पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा १०१ नारळांच्या झाडांची लागवड करण्यात आली.

राज्य शासनाने केलेल्या सूचनेनुसार आपले ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम राबविणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. स्पार्क मिंडा ग्रुप (वायरिंग हार्णेस डिव्हिजन व फाऊंडेशन) चे भाग्यश्री इनामदार, अझरुद्दीन मुजावर, वैष्णवी जाधव, दयानंद शेरे, नितीका गुल्हाणे, निलेश पवळे, कीर्ती दौंडकर, मोहिनी होणावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक निलेश पांडे, सदस्य हनुमंत कदम, नंदा जाधव, वैशाली सुकाळे, प्रतीक्षा दरवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleस्तुत्य उपक्रम | निलेश जरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
Next articleखेड येथील पप्पू वाडेकर व मंचर येथील राण्या उर्फ ओमकार बाणखेले यांच्या खुनातील आरोपी पवन थोरात याला अटक