राजगुरूनगर मध्ये आझादीं का अमृत महोत्सवाचा शुभारंभ

राजगुरूनगर-हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राजगुरूनगर येथे  आझादीं का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्यास १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत,त्यादृष्टीने आझादीं का अमृतमहोत्सव हा कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार २०२३ पर्यंत विविध देशभक्तीपर उपक्रमांनी साजरा करणार आहे.


केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांनी यासाठी दि १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेश यामधे देशातील सर्व विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामधे विविध देशभक्ती उपक्रम राबण्याचे परिपत्रक जारी केले आहे.या साठी आज पुणे जिल्ह्यातील हुतात्मा राजगुरू जन्म स्थळ राजगुरूनगर या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम शुभारंभ करण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ यांनी सूचित केले होते.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व सर सेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

हुतात्मा राजगुरू जन्म स्थळावर या कार्यक्रमाचा शुभारंभ हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून व राजगुरू भक्त मधुकर गिलबिले गुरुजी यांच्या व्याख्यानातून करण्यात आला.

विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी प्रा.नीलिमा पाटील मॅडम व हुतात्मा राजगुरू महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी प्रा.गणेश धुमाळ यांच्या नियोजनाने दोन्ही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा झाला.

मधुकर गिलबिले गुरुजी यांनी आझादीं का अमृत महोत्सव संकल्पना ,उपक्रम,तसेच हुतात्मा राजगुरू जीवन कार्य आपल्या व्याख्यानातून मांडले.यावेळी नेहरू युवा केंद्र पुणे जिल्हा समन्वयक बजरंग बोरकर उपस्थित होते.प्रा.गणेश धुमाळ सर यांनी आरोग्य,क्रीडा ,खेळ यांचे महत्व सांगितले.

प्रास्ताविक प्रा. नीलिमा पाटील मॅडम आणि आभार प्रा.गणेश धुमाळ यांनी मानले.प्रतिज्ञा व राष्ट्रगीत यांनी सांगता झाली.यानंतर आझादी की दौड यात्रा काढण्यात आली.पुढील काळात विविध उपक्रमांतून अझादीं का अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

Previous articleरेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ भारत युवा पुरस्काराने सन्मानित
Next articleपूरग्रस्तांना आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली मदत रवाना