पूरग्रस्तांना आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली मदत रवाना

अमोल भोसले,उरुळी कांचन

आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार व माजी सभापती सुजाता अशोक पवार यांच्या रावलक्ष्मी फाउंडेशनचा एक हात मदतीचा या व संकल्पनेतु केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

चिपळूण, महाड, रायगड या पुरग्रस्त भागातील कुटुंबीयांना 49 संसार उपयोगी वस्तुंचे एकुण 10,000 पेक्षा जास्त किट तयार करण्यात आले आहे.

मदत व्यवस्थित रित्या तेथील कुटुंबियांना पोहोच होणे गरजेचे या उद्देशाने 27 गाड्यांच्या ताफ्यासह शिरूर-हवेलीचे आमदार अॅड् अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता अशोक पवार तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य संसार ऊपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून केली गेलेली सर्वात मोठी मदत आहे.

रावलक्ष्मी ट्रस्ट आणि लोकसहभागातून कोरोनाचे संकट असो अथवा आत्ता महापुराचे संकट बाप्पू आणि भाभी नेहमीच देवदूत होऊन संकटात धावून येत मदत करतात.

बाप्पू आणि भाभी यांच्या मार्गदर्शनाखाली रावलक्ष्मी ट्रस्ट आणि शिरूर-हवेलीच्या जनतेकडून 10,000 पेक्षा जास्त पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत केली. त्याचे खूप मोठे समाधान शिरूर हवेली मतदार संघातील जनतेला नक्कीच आहे.

Previous articleराजगुरूनगर मध्ये आझादीं का अमृत महोत्सवाचा शुभारंभ
Next articleकोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य तसेच देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी दृढसंकल्प होऊया – अजित पवार