कोरोनावर मात करत घरी परतलेल्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत केले स्वागत

Ad 1

राजगुरुनगर-खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कोरोना मुक्त होऊन घरी परतल्यानंतर पोलीस ठाण्यातील सहकारी पोलीस व नागरिकांनी यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.

       खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे गेले चार महिने खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरोना योद्धा म्हणून काम करत होते. शहरात व तालुक्यातील अनेक गावात लॉकडाऊन काळात व नंतरही त्यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुभार्व वाढू नये नागरिकांना सहकार्य करण्याचे अवाहन रात्रंदिवस काम केले होते. तसेच स्वतः रस्त्यावरून उतरुन नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीवर अटकाव करण्यात यश मिळवले होते. तसेच खेड पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन, कंटेनमेंट झोन असतील त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त चोखरित्या लावण्यात यशस्वी झाले होते.

तसेच लोक डाऊन च्या काळात अनेक राज्यातील व परराज्यातील कामगार रस्त्याने पायी जात असताना त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना जेवणाची सोय केली होती. कर्तव्य बजावत असतानाच (दि. १८ जुलै) तब्येत खालवली होती. त्यांनी करोना चाचणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज (दि. २४ ) त्यांना डिर्चाज देण्यात आला. दरम्यान पोलिस ठाण्यातील कर्मचारी भारत भोसले,संतोष मोरे, राजेश नलावडे, संजय नाडेकर, शिवाजी बनकर, संदिप भापकर, विकास पाटील विजय सर्जिने, नागेश आस्टुळे, मंगेश अभंग, शंकर भवारी, अमरदीप वंजारी, राज्य पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पप्पू काका राक्षे,पोलिस पाटील युवराज मांजरे, खंडागळे यांच्या सह नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले.