चालू शैक्षणिक वर्षात १ ली ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्के वगळणार

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

कोविड 19,कोरोना प्रादुर्भावा मुळे चालू शैक्षणिक वर्षात नेहमीप्रमाणे अजून तरी शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत,त्या कधी सुरू होतील यातही अनिश्चितता आहे, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 % कमी करण्यात आलेला आहे.विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन, स्मार्टफोन, दूरचित्रवाणी यासारख्या माध्यमातून अभ्यास करत आहेत, आशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शासनस्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती),आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड)यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील 22, माध्यमिक स्तरावर 20,आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 59 असे एकूण 101 विषयांचा इयत्ता निहाय , विषय निहाय 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कमी केलेला अभ्यासक्रम www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.

Previous articleकोरोनावर मात करत घरी परतलेल्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत केले स्वागत
Next articleदौंड मध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद