घोडेगावचे पंकज पारखे यांची पोलिस नाईकपदी पदोन्नती

ओतूर : -आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे रहिवासी पंकज वसंत पारखे सध्या जुन्नर तालुक्यातील ओतुर पोलिस स्टेशन येथे पोलिस कॉन्स्टेंबल म्हणून कार्यरत आहे. गेले पाच वर्ष त्यांनी प्रमाणिकपणे ओतूर पोलिस स्टेशनच्या गोपनिय विभागाचे कामकाज पाहिले. पुणे ग्रामिण पोलिसदलाचे पोलिस आधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशाने तसेच सेवा जेष्ठतेनुसार पोलिस शिपाई ते पोलिस नाईकपदी पदोन्नोती मिळाली

ओतुर पोलिस स्टेशचे साहायक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे तसेच पोलिस उपनिरिक्षक आकाश शेळके यांच्या हस्ते पदोन्नोती ग्रहण करण्यात आली. पंकज पारखे यांच्या खांद्यावर फीत लावून सन्मानीत करण्यात आले. तसेच पंकज पारखे यांची नियुक्ती आळेफाटा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईकपदी झाली. त्याच बरोबर देविदास खेडकर नवनाथ कोकाटे यांना देखिल कॉन्स्टेंबल ते पोलिस नाईक आशी पदोन्नोती मिळाली

या वेळी आपला आवाजचे आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी तसेच खांमुडी प्रतिनिधी कैलास बोडके सर्व पोलिस कर्मचारी, होमगार्ड, स्थानिक ग्रामस्थ उपस्थीत होते.

Previous articleघोडेगावचे पंकज पारखे यांची पोलिस नाईकपदी पदोन्नोती
Next articleराज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे