राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्य मराठी पत्रकार परिषद,महाराष्ट्र प्रदेश या पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा व तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी यांनी या संघटनेचे राज्य/प्रदेश उपाध्यक्ष सुनील थोरात हे जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात व विचारात घेत नसल्याने त्यांच्या एकतर्फी निर्णयांना कंटाळून २ ऑगस्ट २०२१ रोजी सामूहिक तडकाफडकी राजीनामे पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोनाजन्य स्थिती असल्याचे लक्षात घेऊन हे राजीनामे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य मराठी पत्रकार परिषद,महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे साहेब यांच्याकडे सोशल मिडियाद्वारे २ ऑगस्ट रोजी पाठविले आहेत व आज १० ऑगस्ट रोजी थेट स्पीड पोस्टद्वारे हे सामूहिक राजीनामे पाठविण्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून या पत्रकार संघटनेमध्ये राज्य/प्रदेश उपाध्यक्ष हे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी,सदस्य यांना कोणत्याही स्वरूपात विश्वासात व विचारात न घेता जिल्ह्यात अधिक लक्ष देऊन वादग्रस्त विषय उभे केल्याने संघटनेत वातावरण दूषित झाले.

या त्रासाला कंटाळून राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे पुणे जिल्हाध्यक्ष-विजयराव लोखंडे(पुणे जिल्हाध्यक्ष) तसेच सुनील भंडारे पाटील (उपाध्यक्ष-पुणे जिल्हा),सुभाष शेटे(मुख्य संघटक,पुणे जिल्हा), अनिल खुडे(अध्यक्ष-पुणे शहर), साहेबराव आव्हाळे पाटील ( जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदाधिकारी-पुणे जिल्हा),ज्ञानेश्वर पाटेकर(अध्यक्ष-हवेली तालुका), नंदू बोराडे(अध्यक्ष-आंबेगाव तालुका),शंकर पाबळे (कार्यध्यक्ष-शिरूर तालुका), विजय थोरात (उपाध्यक्ष-शिरूर तालुका),प्रवीण शेंडगे (उपाध्यक्ष- हवेली तालुका),संतोष गाजरे (कात्रज-हडपसर विभाग अध्यक्ष),विजय हडवळे(जिल्हा प्रसिद्धी प्रमुख),अविनाश कदम(पदाधिकारी-शिरूर तालुका),राहुल पायगुडे (पदाधिकारी-पुणे शहर) या पदाधिकारी यांनी सामूहिक तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

राजीनामे सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटनेचे केंद्रीय अध्यक्षांकडे २ ऑगस्ट रोजी पाठविण्यात आले होते.परंतु तरीही केंद्रीय महासचिव पवन बैस यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने संघटनेच्या पत्रावर चुकीच्या पद्धतीने विषय टाकून आमच्याशी पत्रव्यवहार केला व यामध्ये दुफळी व बदनामी केली असल्याचे राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous articleघोडेगावचे पंकज पारखे यांची पोलिस नाईकपदी पदोन्नती
Next articleकै.इंद्रजित सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर