आंळदी शहर मनसेच्या वतीने तळीये गावातील पूरग्रस्तांसाठी मदत

आळंदी – आपण समाजाप्रती काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेतून पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना आळंदी पुढे आली असून एक हात मदतीचा हि संकल्पना राबवत सर्व मदत गोळा केली व जमा झालेली मदत पूरग्रस्त महाड तळीये गावात प्रत्यक्ष जाऊन मदत नेऊन दिली.

पुरामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या #रायगड जिल्ह्यातील,महाड तालुक्यातील तळीये या गावात 25 घरे पूर्ण पणे उध्वस्त झाले.आणि जवळपास 84 लोक मृत्यू मुखी पडले. हे सर्व पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने होहिल तेवडी मदत पोवचवली. दरड कोसळून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तुच्या किट , कपडे , ब्लॅंकेट वाटप केले.

नेहमी वेगवेगळ्या समजोपयोगी उपक्रम राबवनाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत कमी कालावधीत गरजूसाठी मदत गोळा करत प्रत्यक्ष पूरग्रस्त ठिकाणी जाऊन मदत वितरित करण्याचे कार्य केले. झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही . पण गरजवंताना उभं राहण्यासाठी हि मदत आधार बनली. समाजाप्रती आपण हि काही तरी देणं लागतो अशी आत्मीयता व तळमळ मनात ठेवून मिळेल त्या माणसाकडून जशी मिळेल तशी मदत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत मदत पोहच केली.

मनसे नेते बाबू वागसकर,समीर भाऊ थिगळे जिल्हा अध्यक्ष, मनसे मनोज शेठ खराबी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष,संदीप भाऊ पवार तालुका अध्यक्ष मनसे,मंगेश सावंत उपजिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना,अजय दादा तापकीर आळंदी शहर मनसे अध्यक्ष,मंगेश शेठ काळे विध्यार्थी सेनेचे शहर मनसे अध्यक्ष,वैभव काळे उपशहरध्यक्ष, गणेश गायकवाड उपशहरध्यक्ष, आळंदी सागर बुर्डे शहर संघटक,मंगेश कुबडे विभाग अध्यक्ष ,आधार भामरे विभाग अध्यक्ष,कुणाल खोलपुरे सचिव,ज्ञानेश्वर वाढेकर,ऋषिकेश सानप,अशोक पुरी,अभिजित गुंड,सुरज तापकीर,पप्पू शेठ तापकीर,भरत दागट,यश पाटील,यौगेश मोरे,महादेव डेबरे,ज्ञानेश्वर दुगाने,मोहन शिंदे,विजय घोडगे,तेजस नागरगोजे,निलेश परदेशी,पप्पू शिंदे,सौरभ वाघचोरे आदीचे सहकार्य लाभले

Previous articleसंसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून अजय हिंगे यांना वाढदिवसाला व्हिलचेअरची अनमोल भेट 
Next articleज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरग्रस्तांना मदतीचा हात