ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरग्रस्तांना मदतीचा हात

अमोल भोसले,उरुळी कांचन

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रमाण वारकरी संप्रदाय शिकवणीतून सामाजिक बांधिलकी जपत एक मदतीचा हात या नात्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण येथे गेले पंधरा दिवसापूर्वी पाऊस व महापुराने घातलेला धुमाकूळ यामध्ये संपूर्ण जीवन उध्वस्त होऊन गेले. अशा हतबल झालेल्या कुटुंबांना, मदतीचा हात म्हणून पुणे जिल्ह्यातील ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था पुणे या संस्थेतील संचालक वारकरी मंडळींनी एकत्रित येऊन “फुल ना फुलाची पाकळी” मदत कार्य या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी समाजाचे काहीतरी देणे लागतो. “एक मदतीचा हात पूरग्रस्तांना” जीवनावश्यक किराणा १६ वस्तूंचे किट ४० कुटुंबांना, चिपळूण व परिसरात शंकरवाडी, मुरादपुर,व खंदाट (भोईवाडी) या ठिकाणी वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मल्हारी बापू गावडे (वाडे बोल्हाई), आनंद महाराज तांबे(श्रीक्षेत्र थेऊर), सहखजिनदार विलास दादा उंद्रे (कोलवडी ), निवृत्ती महाराज गलांडे (वडगाव शेरी), तात्यासाहेब महाराज हरगुडे (केसनंद), सरपंच उमरोली विजय भडवलकर, उमरोली उपसरपंच संकेत खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली धुमाळ, विशाल सोनवणे,अजय लोंढे इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआंळदी शहर मनसेच्या वतीने तळीये गावातील पूरग्रस्तांसाठी मदत
Next articleमुबंई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदिवासी शाळांना टॅबचे वाटप