कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत

महाळूंगे- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपड्यांची मदत पाठविण्यात आली.आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा टेम्पो  कोकणला रवाना करण्यात आला.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, पूराच्या प्रलयाने कोकण भागातील नागरिकांचे कुटुंब उध्वस्त झाली आहेत. पूरग्रस्त बांधवांना सावरण्यासाठी मदतीची गरज आहे.

संकटात अडकलेल्या आपल्या पूरग्रस्त बांधवांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातून मदत पाठविण्यात येत आहे. नुसती साथ नव्हे तर मदतीचा हात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या प्रवाहात सामिल व्हा-एस.एम.देशमुख
Next articleमहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून पूरग्रस्तांसाठी मदत