हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने आळंदी वृक्षसंवर्धनासाठी ट्री गार्ड ची मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

आळंदी म्हातोबा गावामध्ये गेली २ ते ३ वर्षांपासून सुरु असणारे वृक्षारोपण यांची संपुर्ण माहिती देताना देशी झाडांचे वृक्षारोपण, अस्थि विसर्जन न करता झाडे लावणे तसेच वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणे तसेच संवर्धन करणे या सर्व कार्याची माहिती हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक माऊली जवळकर यांनी आपल्या संस्थेच्या चेअरमन पुनमताई चौधरी यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ समितीसाठी २५ ट्रिगार्ड देण्याचा निर्णय घेतला व लगेचच तयार करून स्वतः घेऊन आल्यानंतर वृक्षारोपण देखील केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गावामध्ये सुरु असणारे वृक्षरोपणाच्या कार्याची थोडक्यात माहिती दिल्यानंतर संस्थेचे संचालक व सोरतापवाडी गावचे माजी सरपंच सागर चौधरी यांनी भविष्यात संस्थेचे संचालक माऊली जवळकर यांच्या माध्यमातून समितीस वृक्षारोपणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व देशीस्वरुपाचे झाडांचे वृक्षारोपण करुन सर्व ट्रिगार्ड व झाडे समितीचे अध्यक्ष संदिप शिवरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

तसेच आळंदी गावच्या वतीने व समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच सोनाली जवळकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन पुनमताई चौधरी, संचालक व मा.सरपंच सागर चौधरी, व्हाईस चेअरमन जयवंत चौधरी, संस्थेचे संचालक तानाजी चौधरी, अमोल चौधरी, रामदास कुंजीर, माऊली जवळकर, आळंदी म्हातोबा गावच्या सरपंच सोनाली जवळकर, वृक्षारोपण संवर्धन समिती व ग्राहक पंचायत हवेली तालुक्याचे अध्यक्ष संदिप शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य विनायक जवळकर, पारस वाल्हेकर, भगवान जवळकर, कैलास शिवरकर, सोसायटीचे मा. चेअरमन शंकरभाऊ जवळकर, मा.उपसरपंच तेजस शिवरकर, राहुल जवळकर, संतोष शिवरकर ,तसेच ग्रामविकास अधिकारी पवार भाऊसाहेब व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार भाऊसाहेब यांनी केले व आभार तेजस शिवरकर यांनी मानले.

Previous articleगुजरात मध्ये कोहिनुर नावाने बनावट चक्क्या तयार करणाऱ्या कारखान्यांवर नारायणगाव पोलिसांचा छापा
Next articleजेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य कौतुकास्पद- डॉ दादासाहेब जगताप