वेदिका फोंडे या विद्यार्थिनींचे ऑनलाइन स्पर्धेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

अमोल भोसले,उरुळी कांचन

वेदिकाने ऑनलाइन स्पर्धेत अवघ्या ४ मिनिटे २४ सेंकंदात १९४ देशाची नावे व राजधानी न अडखळता सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली असल्याने आपल्या गावाच्या दूष्टीने हि गोष्ट आनंदाची असल्याचे सरपंच संतोष कांचन यांनी सांगितले.

येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कुलची इयत्ता चौथी मधील विद्यार्थीनी वेदिका फोंडे हिने नुकतीच एनआयबीएम यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये चमकली.

ग्रामपंचायत उरुळी कांचनच्या संयुक्त विद्यमाने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविकास अधिकारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत ह्या विध्यार्थीनीचा जाहीर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामविकास अधिकारी हनुमंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, अमित कांचन, शंकर बडेकर, सुभाष बगाडे, प्रियंका पाटेकर-कांचन आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

पुणे जिल्हाचे पालकमंत्री – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात वेदिका फोंडे या विद्यार्थिनीचा जाहीर सन्मान केला.
तसेच महात्मा गांधी सर्वोदय संघाची विद्यार्थिनी या नात्याने संस्थेचे उपाध्यक्ष सोपान कांचन यांनीही वेदिका फोंडे या विद्यार्थीचा सन्मान करुन तिच्या उज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या.

Previous articleचासकमान धरण ओव्हर फ्लो ! भिमानदीपाञात विसर्ग सुरू
Next articleगुजरात मध्ये कोहिनुर नावाने बनावट चक्क्या तयार करणाऱ्या कारखान्यांवर नारायणगाव पोलिसांचा छापा