सराईत गुन्हेगाराची भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या

प्रमोद दांगट

मंचर येथील सराईत गुन्हेगार ओकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय २६) यांची डोक्यात गोळ्या घालून भरदिवसा आज रविवार (दि.१ )रोजी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. ही घटना एकलहरे (ता. आंबेगाव ) च्या हद्दीतील फकीर वाडी येथे घडली .

मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

मंचर येथील सराईत गुन्हेगार ओकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले आणि प्रकाश रमेश पगारे (वय
23 राहणार बैल बाजार मंचर) हे स्कूटी क्रमांक एम एच १२ आर जी ६६६८ वरून एकलहरे फकीर वाडीकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी ओंकार उर्फ राम्या अण्णासाहेब बाणखेले यांच्या डोक्‍यात गोळी मारली. त्यात तो जागीच ठार झाला.आणि त्यानंतर हल्लेखोर पसार झाले .

हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेल्या ओकारच्या सोबत असलेला प्रकाश रमेश पगारे हा पूर्णपणे नशेत असल्यामुळे हल्लेखोर किती होते आणि नेमकं कोण होते . याची माहिती उपलब्ध होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही संशयितांची नावे पोलिसांच्या हाती लागली असून पोलिस त्यांना पकडण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडके यांनी दिली .घटनास्थळी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांनी भेट दिली. गोळीबार करण्याचे नेमके कारण समजले नसून हल्लेखोरांना लवकरच पकडले जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक बळवंत मांडके यांनी व्यक्त केला आहे. गोळीबारात ठार झालेला गुन्हेगार ओकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून विनयभंग ,मारामारी आणि वाहन चालकांना लुटण्याचे गुन्हे दाखल आहे. ओंकार उर्फ राण्या बाणखेले बांधलेले याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी अशी चर्चा परिसरात आह.

Previous articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांना पुणे टाईम्स मिरर पुरस्कार प्रदान
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य सचिन सुंबे अभिमान पुरस्काराने सन्मानित