पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना पुणे टाईम्स मिरर पुरस्कार प्रदान

दिनेश पवार

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुणे टाइम्स मिरर अवार्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला,2019 मध्ये नुकताच कोरोना संसर्ग सुरू झाला होता.

यावेळी पवार हे जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक असताना त्यांच्याकडे जिल्हा समन्वय अधिकारी ही जबाबदारी अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली होती ,कर्तव्य बजावत असताना कर्तृत्व, प्रभुत्व, नेतृत्व आशा सर्वांगीण दृष्टीने कर्तव्यदक्ष कामगिरी पवार यांनी बजावत जिल्ह्यात लॉकडाऊन असताना सर्वसामान्य जनतेला आधार देणे,रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धता, औषध पुरवठा, प्रत्येक पोलीस स्टेशन ला आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवणे,नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरती पोलीस स्टेशन मार्फ़त कारवाई करण्याचे आदेश देणे,अडचणीत आलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत करणे,जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा साठी मदत करणे यासारख्या महत्वाच्या कामगिरीत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कर्तव्य बजावले होते याची दखल घेऊन पुणे जिल्हा अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पवार यांची पुणे मिरर पुरस्कार साठी शिफारस केली होती.

सदर अवार्ड गृहमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना या अगोदर देखील आशा कर्तव्यनिष्ठ कामगिरी बद्धल अनेक पुरस्कार मिळाले आहेत, गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे.या पुरस्कारा बद्धल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleखेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शिवसेनेला भगदाड
Next articleसराईत गुन्हेगाराची भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या