भजी न केल्याने वडिलांनी केली मुलीला गंभीर मारहाण

राजगुरूनगर- घरात तेल नसल्याने वडिलांना भजी करून दिले नाही म्हणून वडिलांनी रागाच्या भरात 19 वर्षीय मुलीला गंभीर मारहाण केल्याची घटना खरपुडी ( ता.खेड ) येथे घडली आहे.याबाबत राजाराम दगडू गायकवाड (रा. खरपुडी, ता. खेड) याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतची फिर्याद मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ( दि. 27 ) रोजी फिर्यादी ची मुलगी व पती हे दोघेच घरी असताना राजाराम यांनी मुलीला भजी बनवायला सांगितले घरात तेल नसल्याने मुलीने भजी केले नाही म्हणून वडिलांनी तिच्या डोक्यात वीट मारली व काठीने मारहाण केली या मारहाणीत मुलगी बेशुद्ध पडल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ती शुद्धीवर आल्यानंतर तिने तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याबाबत तिच्या आईने पती राजाराम दगडू गायकवाड याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleशेतीतील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारून जागा बळकवण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल
Next articleशिवनेरी हापूस भौगोलीक चिन्हांकनासाठी २६ लाख ४८ हजारांचा निधी मंजूर:आमदार अतुल बेनके यांची माहिती