स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेत लोकमान्य टिळक जयंती साजरी

दिनेश पवार,दौंड

स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेत लोकमान्य टिळक जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी श्रीराम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भिमराव भंडारी,शाळेचे विशेष शिक्षक गणेश हाके,दिगंबर पवार,दिनेश पाटील, काळजीवाहक विनोद मराठे, विक्रम शेलार,संजय बनसोडे व पालकवर्ग उपस्थित होते यावेळी शाळेचे विशेष शिक्षक दिगंबर पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले की ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही गर्जना करत आज लाखो लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी उत्साह भरणाऱ्या बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान टिळक यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला होता. ब्रिटिश राजवटीशी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पहिल्या स्वातंत्रसैनिकांमध्ये त्यांची गणना होते. देशातील एक शक्तिशाली नेते, शिक्षक, समाज सुधारक आणि वकील अशी ओळख असलेले लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून देखील लोकमान्य ओळखले जातात. कारण ब्रिटिश सरकारच्या विरोधात सामान्य जनतेच्या मनात चीड निर्माण करुन त्यांनी एक मोठा लढा उभारला होता.

लोकमान्य टिळकांप्रमाणेच आपल्या मायभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान नायक म्हणून ओळखले जाणारे शहीद चंद्रशेखर आझाद यांची देखील आज जयंती आहे. चंद्रशेखर आझाद आणि लोकमान्य टिळक हे दोन्ही स्वातंत्रसैनिक आपली मायभूमी स्वतंत्र व्हावी यासाठी प्रचंड आक्रमक होते. या दोन्ही महापुरुषाची एकाच दिवशी जयंती असणं हा देखील योगायोगच म्हणावा लागेल. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिक्षक शिक्षकईतर कर्मचारी अपंग विद्यार्थीच्या वतिते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले

Previous articleआपटी येथील तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस माहेर संस्थेत केला साजरा
Next articleनारायणगाव येथील जुन्नर रस्त्यावरील कोल्हे मळ्यातील शेतकऱ्यांनी अष्टविनायक महामार्गाचे काम केले बंद