आपटी येथील तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस माहेर संस्थेत केला साजरा

गणेश सातव, वाघोली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यातील आपटी या गावातील तरुणांनी एकत्र येत अजित पवार यांचा वाढदिवस माहेर या संस्थेतील अनाथ मुलांसमवेत साजरा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस अनाथ मुलांना खाऊ,जीवनावश्यक वस्तू वाटप करत साजरा केला.

यावेळी अतुल मुरकुटे,अमोल ढगे, चेतन शिवले,नवनाथ शिवले,शरद शिवले, महेश ढगे, शहाजी मराठे, संदिप ढगे ,दत्तात्रय शिवले,प्रशांत ढगे, सचिन अं ढगे ,लक्ष्मण ढगे,प्रकाश ढगे,आकाश राऊत व माहेरचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आमच्या आपटी गावातील तरुण वर्ग सामाजिक कार्यात कायम एकी दाखवत एकत्र येत असतात.मागील वर्षीही कोल्हापूर,सातारा व सांगली परिसरात आलेल्या महापुरामध्ये आपटी गावातून पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली होती.कोरोना काळात गावातील गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिसरात प्रफुल्ल शिवले यांनी सुरू केलेल्या कोरोना सेंटरला देखील आपटी गावातील तरुणांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अतुल मुरकुटे यांनी दिली.

Previous articleआखाड साजरा करायचाय तर हाॅटेल मराठाला नक्की भेट द्या
Next articleस्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेत लोकमान्य टिळक जयंती साजरी