नारायणगाव रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मंगेश मेहेर व सचिवपदी संदीप गांधी

नारायणगाव (किरण वाजगे)

रोटरी क्लब नारायणगावच्या ५१ व्या अध्यक्षपदी मंगेश मेहेर यांची, सचिवपदी संदीप गांधी तर खजिनदारपदी हेमंत महाजन यांची निवड झाली.

या पदग्रहण समारंभाला रोटरी पुणे जिल्ह्याच्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, सरपंच योगेश पाटे, सहकार्यवाह अरविंद मेहेर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर शितल शहा, पंकज पटेल, विद्यासागर जाधव, अजय वाघ, मंगेश हांडे, सचिन काजळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष सचिन घोडेकर यांनी गतवर्षी केलेल्या प्रकल्पांचा आढावा प्रास्तविकात मांडला.

यावेळी प्रांतपाल मंजू फडके, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, अनिल मेहेर,योगेश पाटे, सचिन घोडेकर,मंगेश मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष मंगेश मेहरे यांनी येत्या वर्षभरात हॅपी व्हिलेज, हॅपी स्कूल, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मॅरेथॉन स्पर्धा, रोटरी फेस्टिव्हल,महिला सक्षमीकरण आदि समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले .

सन २०२१ – २२ चे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- मंगेश मेहेर, सचिव-संदीप गांधी, खजिनदार-हेमंत महाजन, संचालक – योगेश भिडे, अमित बेनके, के.एस. बांगा, अशोक भराडिया,डॉ. हनुमंत भोसले,राजेंद्र बोरा, संजीव कुलकर्णी, ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ.मयुरेश वामन,डॉ. प्रशांत काचळे,स्वप्नील जुन्नरकर, प्रा. लहू गायकवाड,प्रशांत ब्रह्मे, कमलाकांत मुंढे,ब्रिजेश बांदिल, तेजस वाजगे, प्रिया कामत,प्रसाद बांगर आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब नारायणगावच्या सर्व सदस्यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत महाजन यांनी केले तर आभार डॉ. हनुमंत भोसले यांनी मानले.

Previous articleसदाशिव नेवकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घेण्याची गरज – ह. भ. प. सुरेखाताई शिंदे
Next articleमाऊलींची पालखी हेलिकॉप्टरने नेण्याचा भाविकांचा प्रस्ताव