माऊलींची पालखी हेलिकॉप्टरने नेण्याचा भाविकांचा प्रस्ताव

अमोल भोसले,उरुळी कांचन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरीच्या दिशेने होणाऱ्या आषाढी वारी करिता महालक्ष्मी एव्हिएशन प्रोप्रायटर दत्तात्रय निवृत्ती गोते पाटील व बाळासाहेब दत्तात्रय भोसले या भाविकांनी होणारी वारी हेलीकॉप्टर मार्फत सेवा करण्याचे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्याकडे दर्शविले आहेत याआधी म्हणजे मागील वर्षी ही वारी कोरोनामुळे एसटीमध्ये नेण्यात आली होती.
मात्र यावर्षी ही पालखी एसटी ऐवजी हेलिकॉप्टर मध्ये नेण्यात यावी ही इच्छा दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार हा सोहळा आळंदी ते वाखरी पर्यंत एसटीने देण्याचे ठरविले आहे व तिथून पुढे पंढरपूर पर्यंत चार किलोमीटर पायी जाणार असून पुढील नियोजन कार्यक्रम प्रथा परंपरेनुसार होतील हे निवेदन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला देण्यात आले हे निवेदन विश्वस्त देसाई व व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांना महालक्ष्मी एव्हिएशनचे सहकारी सागर कुराडे, ऋषिकेश गिलबिले व मोसिन शेख यांच्यामार्फत देण्यात आले.

Previous articleनारायणगाव रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मंगेश मेहेर व सचिवपदी संदीप गांधी
Next articleदोंदे गावातील ३२० नागरिकांची कोरोना अँटीजीन तपासणी