सदाशिव नेवकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घेण्याची गरज – ह. भ. प. सुरेखाताई शिंदे

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव नेवकर यांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाने घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन ह. भ. प. सुरेखाताई शिंदे यांनी नारायणगाव येथे केले.
ग्राममहर्षी सदाशिवदादा नेवकर यांनी ६५ वर्षात अनेकांवर आयुर्वेदीक निशुल्क उपचार केले असून पुलासाठी व मंदिरासाठी जागा दान दिली आहे. स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट, धोलवड यांच्या वतीने ग्राममहर्षी सदाशिव दादा नेवकर यांना “राज्यस्तरीय समाज प्रेरणा पुरस्कार” प्रदान करताना ह. भ. प.सुरेखाताई शिंदे बोलत होत्या.

या प्रसंगी बाबेल ट्रस्टचे सचिव प्रा. रतीलाल बाबेल, राजुशेठ नेवकर, अरुण क्षीरसागर, अनिलतात्या दिवटे, आशिष माळवदकर, शरद कदम, शरद दरेकर, ईश्वरलाल मुथ्था , अशोकलाल मुथा, रामदास शिंदे, एड. विश्वनाथ चव्हाण, प्रमोद वाजगे, सतीश दळवी, नित्यानंद नेवकर, प्रा.रूपाली मुथ्था, प्रा. अर्चना नेवकर,अक्षदा बाबेल, प्रा. अमित मोकाशी, श्रीराज नेवकर, संजय नेवकर, ज्ञानेश्वर नेवकर आदी मान्यवर व नेवकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

पुढे बोलताना सुरेखाताई शिंदे म्हणाल्या की, मुले सगळ्यांनाच होतात, पण आदर्श मुले थोडी असतात, जी आई-वडिलांची मनोभावे सेवा करतात. धन्वंतरी सदाशिवदादा नेवकर यांनी श्री सेना महाराज मंदिरासाठी व पुलासाठी जागा देऊन दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. वडील जिवंत असताना मुलांनी केलेला सोहळा हा आदर्शवत असाच असतो. बाप वाचवा हा उपक्रम बाबेल परिवार गेली पंधरा वर्षापासून करीत आहे याचे कौतुक आहे. जगात हित करणारे आई, बाप आणि संत हेच आहेत. बाप हाच देव आहे. तो आहे तोपर्यंत समजून घ्या. बाप जिवंत असतानाच बाप कळला पाहिजे.

जिवंतपणीच बापाची सेवा करा. आचरण चांगले ठेवा व चारित्र्यसंपन्न बनण्याचा प्रयत्न करा.स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट ,धोलवड चे सचिव रतीलाल बाबेल म्हणाले की, पुरस्कार वितरणाचे हे पंधरावे वर्ष असून आजपर्यंत २४० जणांचा सत्कार कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे. श्री संत सेना महाराज ट्रस्ट च्या वतीने सदाशिवदादा नेवकर यांचा पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन राज्यस्तरीय समाज प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी अनिलतात्या दिवटे, अरुण क्षीरसागर, आशिष माळवदकर, एडवोकेट विश्वनाथ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्चना नेवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रूपाली मुथ्था यांनी केले.

बाबेल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे
दुगड ऊल्हास पोपट., राष्ट्रीय खेळाडू व प्राचार्य ,भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल ,अहमदनगर,
प्रा.डॉ. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे., लेखक, कवी ,वक्ता व संपादक, महाराष्ट्र साहित्य पत्रिका., घोडेगाव,
बापूजी खंडू ताम्हाणे.
प्राचीन इतिहास संशोधक,अभ्यासक, गोळेगाव, ता.जुन्नर,जिल्हा.पुणे.
संतोष हरिश्चंद्र सहाणे., प्रमुख मार्गदर्शक व सेंद्रिय शेती सल्लागार, जुन्नर.
कै. सौ. आशा नितिन डावखरे., आदर्श शिक्षिका लेखिका, नारायणगाव. वोपा(vowels of the people association), पुणे.
शाळा व शिक्षण संस्था उत्कृष्ट होण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था.
दुर्ग प्रेरणा पुरस्कार : गौरव शामकांत शेवाळे.,
सह्याद्री दुर्ग सेवक, चिंचवड.

उपक्रमशील शाळा पुरस्कार :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगवे ,तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद; तालुका- जुन्नर, जिल्हा- पुणे.
न्यू इंग्लिश स्कूल ,आंबोली; तालुका- जुन्नर, जिल्हा -पुणे.

ज्ञान प्रेरणा पुरस्कार : मोहन निवृत्ती किन्हाळे
मुख्याध्यापक, तोरणा सागर माध्यमिक विद्यालय ,निवि ,तालुका – वेल्हे,जिल्हा -.पुणे.
महेश श्रीपत पोखरकर.
प्राध्यापक, समर्थ पॉलिटेक्निक आणि समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज,बेल्हे.
नंदाराम रोहिदास टेकावडे.
उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साखर शाळा (निवृत्ती नगर).
श्रीमती मृणाल नंदकिशोर गांजाळे.
उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,पिंपळगाव तर्फे महाळुंगे ;तालुका -आंबेगाव ,जिल्हा- पुणे.
विज्ञान प्रेरणा पुरस्कार,
निलेश ज्ञानेश्वर पोखरकर.
(विज्ञान सहाय्यक, आयुका वेधशाळा,गिरवली.ता.आंबेगाव. जि. पुणे.)

Previous articleहडसर गडावर गिर्यारोहकांनी अनुभवला खुंटीच्या वाटेचा थरार
Next articleनारायणगाव रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी मंगेश मेहेर व सचिवपदी संदीप गांधी