समव्यावसायिकाचे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान – सुरेश गडाख

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)

नारायणगाव ता जुन्नर येथील बनावट कोहिनूर आटा चक्की बाबत आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले असून यामध्ये कॉपीराइट चा गुन्हा दाखल झालेल्या गडाख मशनरीज चे मालक सुरेश गडाख यांनी आमच्याकडे विक्री व्यवसाय करण्याचा रीतसर परवाना असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

गेल्या २.५ वर्षात जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी आमच्या गडाख मशीनरीज या दुकानाला पसंती दिली व मोठया प्रमाणात आमचा ग्राहक वर्ग तयार झाला याचा आकस शहा कुटुंबाच्या मनात तयार झालाय आणि त्यामुळेच पराग शहा व सुहास शहा यांनी आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान केले असल्याचा आरोप गडाख मशिनरीजचे प्रमुख सुरेश गडाख यांनी रविवार (दि.11) अकरा रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये केला.

जुन्नर तालुक्यात कोहिनूर कंपनीचा बनावट लोगो लावून गडाख मशिनरीज आटा चक्की विक्री करतात असा आरोप करत पराग शहा यांनी नारायणगाव पोलीसांच्या मदतीने धाड टाकत माल जप्त केला होता. आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता.

यावर गडाख मशिनरीजचे प्रमुख सुरेश गडाख यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, गुन्हा दाखल झाला असला तरी सत्य काय आहे हे स्पष्ट करत जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या न्यायालयात आम्हाला नक्की न्याय मिळेल. आम्ही गेली १५ – १६ वर्षांपासून जय खोडियार या गुजरातच्या कंपनीची कोहिनूर या ब्रँड ची बॉक्स आटा चक्की विकत आहोत. ‘जय खोडियार ‘ या कंपनीचा माल अगोदर विनोद सेल्स विकत होते पण ,या कंपनीने आम्हाला अकोले मध्ये डीलरशिप दिली हे त्यांना समजल्यावर त्यांनी कंपनीला तुम्ही त्यांना बॉक्स चक्की देऊ नये मी त्यांना माल पुरवतो अशा काही अटी कंपनीकडे घातल्या,परंतु त्या कंपनीला मंजूर नव्हत्या म्हणून कंपनीने त्यांच्याशी काम करणे बंद केले. त्यानंतर कंपनीने नाशिक , अकोले , संगमनेर , आळेफाटा , नारायणगाव , मंचर , राजगुरूनगर , पुणे आणि सातारा – कोल्हापूर पर्यंत डीलर नेमले. त्यानंतर विनोद सेल्स नारायणगाव यांनी एका कंपनीकडून बॉक्स चक्की बनवून कोहिनूर नाव लावून घेतले व तो माल मार्केट मध्ये आणला. त्यानंतर ‘जय खोडियार’ या कंपनीने हा ब्रँड रेजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्ज टाकला व मग त्या कंपनीचा आपापसात दोन कंपन्यांमध्ये कोर्टामध्ये वाद गेला. दहा वर्षांपासून हा वाद चालू आहे. अद्यापही कोर्टाचा निकाल लागलेला नाही. कोर्टात वाद चालू असताना संबंधित इसमाने कॉपीराईट लायसन्स मिळवले परंतु, त्याची कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा समज आम्हाला किंवा आमच्या उत्पादकाला दिली नाही. तसे करणे अपेक्षित होते परंतु जाणीवपूर्वक आमच्यावर अचानकपणे पोलिसात तक्रार दाखल करून आमची बदनामी करण्याचा उद्देशाने हा सर्व प्रकार घडवून आणलेला आहे.

पोलीसात तक्रार करताना देखील वास्तविक पाहता दुकानाचे मालक अभिषेक कासार व सनेश गडाख हे दोघे आहेत. त्यामध्ये दुकानाचा कारभार पूर्णवेळ अभिषेक कासार पाहतात येथे सुधीर गडाख यांचा काहीही संबंध येत नाही तरी देखील सुधीर गडाख यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव या तक्रारी मध्ये दाखल केले आहे. या वरून आमची बदनामी करणे हा त्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो”

“गेली १५ वर्षांपासून आम्ही संगमनेर-अकोले येथे याच चक्कीचा व्यवसाय करतो तेंव्हा कोणत्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेतले नाही परंतु नारायणगाव मध्ये दुकान सुरु केल्यानंतर हे प्रकार सुरु केले.

दरम्यान खरेदी करून विक्री करणे हा आमचा व्यवसाय आहे, उत्पादन करणे हे आमचे काम नाही. उत्पादनासाठी व मार्केटिंग साठी कुठल्या कागदपत्रांची पूर्तता लागते याची कल्पना नाही त्यामध्ये ट्रेडमार्क, रेजिस्ट्रेशन किंवा कॉपीराईट हे सर्टिफिकेशन मिळवणे हे उत्पादकाचे काम आहे. आम्ही रीतसर GST भरून पक्की बिले घेऊन व मालाची क्वालिटी तपासून माल खरेदी करतो व ग्राहकांना वॉरन्टी देऊन विक्री करणे व सेवा देणे हे आमचे काम आहे. असेही गडाख यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी सुधीर गडाख, अभिषेक कासार, अशिष सूर्वे तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleराजगुरूनगर मध्ये तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी राहुल मोहोळ यांची निवड