राजगुरूनगर मध्ये तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या

राजगुरूनगर- जुन्या गुन्हेगारी वादातून पिस्तुलातून फायरिंग करत डोक्यात दगड टाकून तडीपार गुंड पप्पू वाडेकर याचा राजगुरूनगर पाबळरोड येथे खून करण्यात आला. हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते. परंतु या गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. ग्रामीण भागात लहान वयातील गुन्हेगारी, टोळीयुद्ध संपवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काही टोळी प्रमुखांना तडीपार केले होते. मात्र, त्यांच्या साथिदारांकडून एकमेकांना शह देण्याचे काम सुरुच राहिल्याने पप्पू वाडेकरचा खून झाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous articleवीज पडली अन् गंगा अवतरली
Next articleसमव्यावसायिकाचे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान – सुरेश गडाख