वीज पडली अन् गंगा अवतरली

अमोल भोसले,उरुळी कांचन

नैसर्गिक शक्तीचा कधी, कोठे आणि काहीही चमत्कार घडू शकतो असे आपण नेहमीच ऐकतो. परंतु, नैसर्गिक आपत्तीचाही एखाद्या भागासाठी वरदान ठरू शकतो का? तर हो. याचा प्रत्यय बारामती तालुक्यात आला आहे.

कारखेल (ता. बारामती) येथे शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमार विजांच्या कडाक्यात पाऊस सुरू झाला. या पावसात कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात वीज पडली होती. आणि त्याच ठिकाणाहून पाणी वाहू लागले आहे.

गावातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांनी माळरानावर अचानक जमिनीतुन पाण्याचा प्रवाह वाहताना दिसून आला. शेतकऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पहिले असता, त्यांना ज्या जागेवर वीज पडली असल्याचे दिसले. आणि विजेच्याचपडलेल्या भेगेतून पाणी वाहू लागल्याचे दिसून आले.

वीज पडलेल्या भेगेतून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. या प्रवाहामुळे परिसरात मोठया प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पाहण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

दरम्यान, कारखेल हे गाव देखील जिरायती पट्ट्यात असल्यामुळे कायमच पाण्याची टंचाई असते. याठिकाणी उन्हाळ्यामध्ये जनावरांसह माणसाना देखील पाण्यामुळे हाल होतात. परंतु, वीज पडल्यामुळे आमच्या गावात गंगा अवतरली आहे. अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Previous articleवेळ मिळेल तेवढा गरीबांच्या सेवेसाठी घालवणार- वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी
Next articleराजगुरूनगर मध्ये तडीपार गुंडाची दगडाने ठेचून हत्या