सीएनजी कंपनीच्या माहितीसाठी चर्चासत्राचे आयोजन

दिनेश पवार,दौंड

लोणारवाडी (ता.दौंड) येथे धनअशोका सीएनजी कंपनी च्या माहितीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.हत्तीगवत म्हणजेच नेपिअर ग्रास या पासुन इंधन निर्मिती करणारा कारखाना मीरा क्लिनफ्युअलस लिमिटेड संचलीत लवकरच तालुक्यात उभा राहत आहे त्याचे भुमीपुजनही झाले आहे.

यासाठी शेतकरी सभासद नोंदणी चालु आहे,शेतकऱ्यांना एकरी भरघोस उत्पन्न कसे मिळेल. सभासद होणाऱ्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा देण्यात येणार तसेच युवा वर्गाची रोजगार निर्मिती कशी निर्माण होईल अशा विविध विषयांवर लोणारवाडी या ठिकाणी चर्चासत्र करण्यात आले होते.कंपनीचे अध्यक्ष अशोक गिरमकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली तर पर्यावरण संवर्धनासाठी प्रदुषण रोखण्यासाठी याचा फार मोठा फायदा निसर्गाला होईल असे धनअशोका सीएनजी कंपनीचे अध्यक्ष अशोक गिरमकर यांनी सांगितले.याप्रसंगी लोणारवाडीचे सरपंच,उपसरपंच,सोसायटिचे चेअरमन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदौंडच्या लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांमध्ये भेदभाव कशासाठी ?
Next articleलोणीकंद-भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ तापकीर यांची बिनविरोध निवड