लोणीकंद-भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ तापकीर यांची बिनविरोध निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोणीकंद येथील भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन रघुनाथ कंद यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमनपदासाठी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे प्रदिप कंद व माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणराव कंद यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर पतसंस्थेचे माजी चेअरमन रघुनाथ तापकीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन चेअरमन रघुनाथ कंद यांनी चेअरमन पदाचा पदभार नवनिर्वाचित चेअरमन रघुनाथ तापकीर यांच्याकडे सोपावला. यावेळी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत अभिनंदन केले.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली माजी उपसभापती नारायण कंद, मा आदर्श सरपंच श्रीकांत कंद, मा उपसरपंच व मा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुर्यकांत मोरे, मा चेअरमन जनार्दन वाळुंज, भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे मा व्हा चेअरमन गुलाबराव कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे मा संचालक सुभाष कंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय कंद, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कंद, संपतराव कंद, दत्तात्रय कंद, गोपीनाथ इंगळे, बाबुराव आव्हाळे, दिनकर दहिफळे, तानाजी देवकुळे, युवा उद्योजक अमोल कंद,उत्तम झुरुंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसीएनजी कंपनीच्या माहितीसाठी चर्चासत्राचे आयोजन
Next articleपवनाधरण परिसरात पर्यटकांचा महापूर, वींकेंड बंदीचा उडाला पूर्ता फज्जा