दौंडच्या लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांमध्ये भेदभाव कशासाठी ?

श्रावणी कामत

दौंड- तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतील पत्रकारांना ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देऊन पत्रकार मध्ये वेगळा संदेश देत असून त्यांनी असा भेदभाव करणे योग्य नसल्याचे मत जेष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र पत्र परिषदेचे पुणे प्रतिनिधी एम.जी. शेलार यांनी व्यक्त केला.

शेलार पुढे म्हणतात, दि ४ जुलै रोजी केडगाव येथे झालेल्या कै, माजी आमदार सुभाष आण्णा कुल स्मृतिदिन कार्यक्रमात  आमदार कुल यांनी कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या खास मर्जीतील सहा पत्रकारांना ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देऊन सन्मान केला आहे, पत्रकारांचे सन्मान करणे हे लोकप्रतिनिधी यांच्या उदात्त विचारांचे आदर मानून पत्रकारांना पुरस्कार दिला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो पण लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना पुरस्कार देताना कोणाला द्यावे हा त्यांच्या मर्जीचा विषय आहे, परंतु पत्रकारांना पुरस्कार देताना तो आपल्या खास मर्जीतील लोकांना दिला तर त्याचा वेगळा संदेश बाहेर जातो, लोकप्रतिनिधीं तालुक्यात वेगाने विकास कामे करीत आहेत. त्यांच्या कामाचे वृत्ताकन सर्वच पत्रकार तत्परतेने करीत असतात. मग पुरस्कार मात्र तालुक्यात अंदाजे 70 ते 80 पत्रकार असताना मर्जीतील सहाच लोकांना कसा दिला गेला.यासह तालुक्यात विशेषतः लोकप्रतिनिधी यवत येथील विश्राम गृह येथे तालुक्याच्या विकासासाठी अनेक वेळा बैठका घेतात.यामधून चांगला निर्णयही होतो मात्र त्यावेळी ते मर्जीतील पत्रकारांना बोलावतात त्यांचे जेव्हढे असतील ते पीएसाहेब हे सुद्धा प्रसिद्धीसाठी मर्जीतील पत्रकार यांनाच माहिती पाठवतात याबाबत यापूर्वी मत नोंदवले असतानाही त्यांनी दखल घेतली नाही.खाजगीत लोकप्रतिनिधी मर्जीतील पत्रकारांना जीवापाड जपून सेवा सुख सुविधा जरूर द्याव्यात परंतु सार्वजनिक ठिकाणी सर्वच पत्रकारांना दुजाभाव न करता समान समजून तशी समानतेची वागणूक द्यावी, या माफक अपेक्षा आहेत.विशेष लोकपतिनिधी ओंकार थोरात साहेब हे ही दुजाभाव करण्यात पुढेच असतात ते अन्य पत्रकारांशी बोलण्याचेही टाळतात, मर्जीतील सहा पत्रकार यांनाच पुरस्कार का दिला ? अन्य पत्रकारांना का दिला नाही ? ही पार्सलिटी नव्हे काय ? आणि ती योग्य नव्हे असे विचारले, यावर ते म्हणाले हे सहाच पत्रकार कार्यक्रमास आल्याने त्यांनाच पुरस्कार दिले. अन्य पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत असे सोईस्कर उत्तर दिले.

Previous articleआज आम्ही आंदोलन करायला नाहीतर प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलोय
Next articleसीएनजी कंपनीच्या माहितीसाठी चर्चासत्राचे आयोजन