कचरा समस्येवर तोडगा न निघाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

राजगुरुनगर- शहरात प्रवेश करतानाच पोलिस स्टेशनच्या मागे असणारा कचरा डेपोतील कचरा कित्येक महिने उचलला गेलेला नाही. त्यामुळे सदरच्या कचरा रस्त्यावर येवुन आणि पावसामुळे कुजुन असह्य अशी दुर्गंधी परिसरात पसरली आहे. या ठिकाणी पोलिस स्टेशन मधे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्यांनाही या दुर्गंधीचा त्रास कित्येक महिने सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची भिती निर्माण झालेली असुन यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

वेळो वेळी नगरपरिषदेला याबाबत तक्रारी आणि निवेदने देवुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज आम्ही राजगुरुनगरकर या संघटनेच्या वतिने नगरपरिषद प्रांताधिकारी ,तहसीलदार व पोलिस स्टेशन या कार्यालयांना निवेदन देवुन त्वरीत कचरा हटवण्याची मागणी करण्यात आली. जर सदरचा कचरा दहा जुन पर्यंत उचलला न गेल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी पाटील यांनी पुढील पाच दिवसात हा कचरा हटवला जाईल असे आश्वासन दिले तर प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक विक्रांत चव्हाण यांनी आजच यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

जर या कामात पुढील चार दिवसात प्रगती न दिसल्यास सदरचा कचरा भरुन तो नगरपरिषदेच्या दारात खाली करण्याचा इशारा आम्ही राजगुरुनगरकर च्या शिष्टमंडळाने दिला.

निवेदन देण्यासाठी अमर टाटीया, राहुल पिंगळे, मिलिंद शिंदे, नितिन सैद, शंकर राक्षे, राहुल आढारी, नितेश पवार, स्वप्निल माटे, दिपक थिगळे, ऍड. निलेश आंधळे हे सभासद उपस्थित होते.

Previous articleअनलॉकची प्रक्रिया सुरु करणार केल्याने आगामी काळात पर्यटनास बहर येणार
Next articleमुळशी तालुक्यात रासायनिक कंपनीला आग, १५ महिलांचा मृत्यू