सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा समाजरत्न व सेवारत्न पुरस्काराने सन्मान

चाकण – सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांनी समाजरत्न पुरस्काराने तर शांतीदूत परिवारातर्फे शांतिदुत सेवारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

ग्राहक कल्याण समितीचे संस्थापक तसेच पत्रकार सरंक्षण समिती नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि नागपूर पोलीस आयुक्तालय शांतता समितीचे सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते डॉ आशिष अटलोये यांनी बापूसाहेब सोनवणे यांच्या सामाजिक कामाची शिफारस केली.
तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव(से.नि)यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या शांतिदुत परिवारातर्फे त्यांना शांतिदुत सेवारत्न पुरस्कार आणि पुणे जिल्हा कमिटीवर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करून सन्मान करण्यात आला.यावेळी बापूसाहेब सोनावणे यांनी रक्तदान केले.पुणे सायबर क्राइमच्या DCP भाग्यश्री नवटके,साखर आयुक्त शेखर गायकवाड,रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.

चाकण मध्ये राहणारे बापूसाहेब सोनवणे यांनी निसर्गमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख निर्माण केलीय.शासनमान्य सर्पमित्र म्हणून गेली 20 वर्षे काम करत असताना त्यांनी अनेक तरुणांनाही प्रशिक्षण दिलंय ते तरुण पुणे जिल्हा आणि परिसरात साप,वन्य जीव वाचवण्याचे काम करत आहेत.त्यांचे छोटे बंधू डॉ गोरक्षनाथ सोनवणे पशुवैद्यक असून त्यांनीही बापूंकडून साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतले आणि ते ही साप पकडण्याबरोबरच जखमी वन्य जीवांवर उपचार करून त्यांना निसर्गात मुक्त करत आहेत.बापूसाहेब सोनवणे यांनी पाण्यातल्या योगावर कुशलता प्राप्त केलीय जमिनीवर ते योगा करतातच परंतु पाण्यात कितीही काळ योगासन मुद्रेत राहतात विशेष म्हणजे योगाचं विनामूल्य प्रशिक्षण देतात.आजपर्यंत त्यांनी हजारो साप वाचवलेत त्याचबरोबर अंध अपंगांना मदत करण, सामाजिक दुर्लक्षित वंचित घटकांना मदत करणं ,वृक्षलागवड करणं,लोकजागृती मधून निसर्गसंवर्धन, पोलिसांना मदत ,रक्तदान असे विविध उपक्रम ते राबवत असतात आतापर्यंत त्यांनी 10 वेळा रक्तदान केलंय .या पुढेही हे उपक्रम सुरूच राहणार असे त्यांनी सांगितले. सेवारत्न व समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक व होत आहे.

Previous articleजेष्ठ कीर्तनकार व शिवनेरभूषण भागवताचार्य ह.भ.प.सुमंत महाराज नलावडे यांचे निधन
Next articleलोणी येथे चोरी केलेल्या दोन चोरट्यांना अटक