लोणी येथे चोरी केलेल्या दोन चोरट्यांना अटक

प्रमोद दांगट : निरगुडसर

लोणी (ता.आंबेगाव) येथील बांधन वस्ती येथे दीड महिन्यापूर्वी ज्येष्ठ दांपत्याला गंभीर मारहाण करत त्यांना मारहाण करत चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा यांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्यांना मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणी पाबळ रस्त्यावर असलेल्या बांधनवस्ती येथे नानाभाऊ दगडू आदक (वय ६०) पत्नी मिरा (वय ५५) व आई यमुनाबाई दगडु आदक ( वय ९० वर्ष) असे तीघेजण राहतात सोमवार दि १४ /१२/२०२० रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दरवाजा वाजवून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने नाना आदक यांच्या डोक्यावर लोखंडी सळई मारली व मिरा आदक व यमुणाबाई आदक यांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने काढुन घेतले मिरा आदक यांच्या कानातील सोन्याच्या कुड्या ओढून नेल्या होत्या चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम मिळून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या अज्ञात चोरट्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे , दिपक ऊर्फ आशिक आझाद काळे (वय वर्षे २५ दोघे रा. निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना आळेफाटा पोलीस ठाणे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून काही मुद्देमाल व हत्यारे ताब्यात घेतले आहेत.या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीचा गुन्हा कबूल केला आहे.या आरोपींना पुढील तपासासाठी मंचर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा समाजरत्न व सेवारत्न पुरस्काराने सन्मान
Next articleअवैध धंदे करणाऱ्यांवर मंचर पोलीसांची कारवाई