Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
योगेश राऊत, पाटस
पाटस-दौंड रस्त्यावर चारचाकी गाडी व मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. २८) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस येथील अंबिकानगर परिसरात ही घटना घडली आहे.या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना दौंड येथील खाजगी रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनातील प्रवासी हे जालनावरून जेजुरी या ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी चारचाकी गाडीतून निघाले होते. सहा वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रक हा पाटस बाजूकडुन दौंड दिशेला जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये ट्रकची दोन्ही चाके तुटून पडली आहेत, तर कार ही चक्काचूर झाली आहे, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळतात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित इंगवले, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, चारचाकी गाडीतील जखमी प्रवाशांना पुढील
उपचारासाठी दौंड रुग्णालयात हलवण्यात आले.
याबाबत पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.