विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या व्यासपीठावर थेट बैलगाडा : समई नृत्य सादर करून संध्या माने यांनी मिळवली रसिकांची वाहवा

नारायणगाव , किरण वाजगे

तमाशा पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी समजली जाणाऱ्या नारायणगाव येथील श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत आयोजित केलेल्या तमाशा कार्यक्रमात राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या व्यासपीठावर थेट बैलगाडा आणून “पाटलांचा बैलगाडा” हे गीत सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष करत या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. यावेळी पोलिसांना देखील युवकांना आवरणे कठीण झाले होते म्हणून नाचत असलेल्या ठिकाणीच पोलीस हातात दांडके घेऊन उभे होते.

दरम्यान या तमाशा कार्यक्रमात विठाबाई नारायणगावकर यांची कन्या संध्या माने सोलापूरकर यांनी आकर्षक समई नृत्य व समई थाळी नृत्य करून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

दरम्यान गुरुवार (दि. २०) रोजी नारायणगावात सुरू असलेल्या यात्रा उत्सवात अनेक आबाल, वृद्ध, महिला व तमाशा रसिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleचोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त
Next articleपाटस दौंड रस्त्यावर ट्रक व कारचा भीषण अपघात; अपघातात आठ प्रवासी जखमी