दौंड तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना चा विळखा वाढला

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना चा पुन्हा विळखा वाढल्याने परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे, आज दिनांक 9 /8/2020 रोजी कोरोना चे एकूण 10 व्यक्ती पॉजीटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे, ग्रामीण भागातून एकूण 99 रिपोर्ट तपासणी साठी पाठवण्यात आले होते,त्यातील 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली, यातील केडगाव:-2 यामध्ये 70 वर्षीय पुरुष,60 वर्षीय महिला, भांडगाव:-2 यामध्ये 22 वर्षीय,40 वर्षीय पुरुष, पिंपळगाव:-3 यामध्ये 19 वर्षे,40 वर्षे,42 वर्षीय पुरुष, देलवडी:-2 यामध्ये 50 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरुष,पाटस:-1 महिला, अशा ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

तालुक्यात कोरोना चा चाललेला हा खेळ कधी दिलासादायक तर कधी चिंताजनक बनत आहे, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, सुरक्षा, काळजी घेणे गरजेचे आहे,विनाकारण बाहेर पडणे,आरोग्य विभागाने दिलेले नियम,खबरदारी पाळण्यास टाळाटाळ करणे,आपण काय बाहेरून आलोय काय, आपण तर इथलेच आहे, काही होतं नाही असा समज करून वावरणे म्हणजे कोरोना ला आमंत्रण देणे होय,यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे व खबरदारी घेणे गरजेचे आहे

Previous articleग्रामसंसद ही वास्तू गावाच्या वैभवात भर टाकणारी – खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleआँगस्ट क्रांती मैदानावर जावून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले अभिवादन