ग्रामसंसद ही वास्तू गावाच्या वैभवात भर टाकणारी – खासदार डॉ अमोल कोल्हे

किरण वाजगे,नारायणगाव – वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद ही वास्तू गावच्या वैभवात भर टाकणारी व नावलौकीत वाढविणारी आहे असे गौरवोदगार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले .

वारूळवाडी येथे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामसंसद भवन या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

यावेळी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे , सभापती ऍड संजय काळे , जि. प.सदस्या आशा बुचके , पांडुरंग पवार , सरपंच जयश्री बनकर , उपसरपंच सचिन वारुळे , रमेश भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ , उद्योजक संजय वारुळे, बाजार समिती संचालक विपुल फुलसुंदर , ग्रामसेवक विद्याधर मुळूक , जालिंदर कोल्हे , जंगल कोल्हे , राजेंद्र मेहेर , रवी साळुंके , अविनाश घोलप ,सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे आणि विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनीही भेट दिली .

उत्तर पुणे जिल्हात सर्वात मोठी आणि अद्यावत सुविधा असलेली  १५ हजार ८०० स्क्वे. फुटाची ही ग्रामपंचायत इमारत असून या ग्रामपंचायतीमध्ये स्वागतकक्ष, सरपंच , ग्रामसेवक कक्ष , अतिथी कक्ष , अभिलेख कक्ष , वाचनालय अशा सुविधा आहेत ,तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वारूळवाडी ग्रामपंचायत ओळखली जाणार आहे अशी माहिती संजय वारुळे आणि उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली .

याप्रसंगी उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल स्थापत्य अभियंता रवी साळुंखे व अविनाश घोलप यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ व  आरोग्य सेवक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेहेर यांनी केले तर जंगल कोल्हे यांनी आभार मानले .

दरम्यान  जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचा पुणे याठिकाणी कोरोना उपचारा दरम्यान निधन झाल्याने हा उद्घाटन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करीत अवघ्या २० मिनिटांत हा कार्यक्रम साजरा करून सर्व प्रमुख उपस्थितांच्या वतीने दशरथ पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

Previous articleजुन्नर तालुक्यात ५०८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३६५ रुग्ण बरे होऊन घरी,दोन मृत्यू
Next articleदौंड तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना चा विळखा वाढला