दुकाने उघडी ठेऊन गर्दी जमविणाऱ्या दुकानदारांवर मंचर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील अनेक गावे केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्रात विनापरवाना फिरणे, गर्दी जमवणे, दुकाने उघडी ठेवणे यासाठी बंदी असतानाही एकलहरे,व पेठ येथील काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडून दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होईल असे वर्तन केले. तसेच कोरोना या संसर्गाचा प्रसार होईल असे वर्तन केल्याने विविध सात दुकानदारांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे.

आंबेगाव तालुक्यात गावागावांत कोरोना रुग्ण वाढत असून तालुक्यातील कोरोना रुग्ण २०० च्या वर गेले आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात व परिसरात कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचार बंदीचे उल्लंघन करू नये, दुकाने उघडून गर्दी जमवू नये असे आदेश असतानाही तालुक्यातील पेठ येथे सोमवार दि .२८ रोजी चंद्रकांत हरिभाऊ शेलार (वय ५५) यांनी आपले हॉटेल सर्जा सुरू ठेवले तर अनिल मनोहर शिंदे ( वय ४० ) यांनी आपल्या भाजीपाला दुकान सुरू ठेवले होते.या दोन दुकानदारांवर पेट्रोलिग करत असलेले मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मडके,पोलीस हवालदार मांडवे,पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन माताडे,यांनी कारवाई केली आहे.

तर एकलहरे येथे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत भुजबळ, पोलीस हवालदार मांडवे,पोलीस नाईक राजेंद्र हिले हे पेट्रोलिंग करत असताना एकलहरे गावाच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेच्या बाजूला सुनंदा दत्तात्रय कुरकुटे (वय ४५ ) यांनी हॉटेल तेज सुरू ठेवले होते व,रवींद्र बबन गुळवे (वय ४८ ) यांनी मिसळ हाऊस चे दुकान उघडले होते.या सर्वावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेश पालन न करणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहे.

Previous articleपुरोगामी माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल शंभर टक्के
Next articleबायकोने तक्रार केल्याने तीन बायकांचा दादला पोलीसांच्या जाळ्यात अडकला