पुरोगामी माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल शंभर टक्के

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल सलग अकाराव्या वर्षी लागला असून सेंमी इंग्रजी वर्गाचा शंभर टक्के निकाल निकालात यंदाही मुलींची बाजी. नायगाव (ता.हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या परिक्षेत ऋतुजा दत्तात्रय चौधरी (९२.६० %) प्रथम आली. सोनाली पांडुरंग शेलार (८९.६० %) व्दितीय आली. तनुजा प्रकाश माने (८९.४० %) तिसरी आली. साक्षी सुनिल चौधरी (८९.२० %) चौथी आली. तसेच दिशा पोपट थोरात (८७.८० %) पाचवी आली . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे, उपाध्यक्ष रामदास चौधरी, सचिव रंगनाथ कड, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

तसेच उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीच्या परिक्षेत सानिका गणपत कांचन (९६.४० %) प्रथम आली. अंकिता भाऊसाहेब कुंजीर (९५.४० %) व्दितीय आली. साक्षी विलास कदम (९४.२० %) तिसरी आली. पुर्वा मोहन खराडे (९३.६० %) चौथी आली. तसेच अनुष्का आबासाहेब कुंभार (९३.४० %) पाचवी आली तर गणित विषायात तिला शंभर पैकी शंभर पडले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन, सचिव सोपान कांचन, खजिनदार राजाराम कांचन, विश्वस्त, महादेव कांचन, देविदास भन्साळी, राजेंद्र टिळेकर, संभाजी कांचन, तसेच विद्यालयाचे प्राचार्य देविदास टिळेकर, उपप्राचार्य बबन दिवेकर, पर्यवेक्षक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.आणि
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल लागला.

श्रेया धानप्पा चप्पळगे (९७.२० %) पहिली आली. शिवनेरी अतुल रगडे (९३.२० %) दुसरी आली. शिवम राजेश दरेकर (९२.४० %) तिसरी आली. समृद्धी विलास मोहिते (९१.८० %) चौथी आली. संस्कृती शिवाजी कांचन (९१.२०) पाचवी आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, बंडोपंत कांचन, संभाजी कांचन, अशोक कांचन, पंडित कांचन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Previous articleपुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड
Next articleदुकाने उघडी ठेऊन गर्दी जमविणाऱ्या दुकानदारांवर मंचर पोलिसांची कारवाई