सणसवाडी येथे अवैध दारू धंद्यावर पोलीसांचा छापा साडेपाच लाखाचां मुद्देमाल जप्त

प्रमोद दांगट

सणसवाडी (ता. शिरूर) येथून एक युवक चारचाकी वाहनातून देशी, विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती गुप्तचरांकडून शिक्रापूर पोलिसांना मिळाल्यानंतर 15/7/2020 रोजी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी सणसवाडी येथे छापा टाकत दारूचे तब्बल सतरा बॉक्स आणि चारचाकी गाडी सह सुमारे पाच लाख छपन्न हजार सातशे बारा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली आहे.
सणसवाडी ता. (शिरूर )येथून एक इसम चारचाकी गाडीतून दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हानंद पोवार, संदीप जगदाळे, अविनाश पठारे, विकास मोरे यांसह आदींनी सणसवाडी येथे जाऊन सापळा रचला असता त्यांना एम एच १२ आर एफ ३३०८ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कारमध्ये दारूचे बॉक्स घेऊन आल्याचे समजल्यानंतर
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कारची पाहणी केली असता त्यामध्ये देशी, विदेशी असे दारूचे सतरा बॉक्स असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी स्विफ्ट कार दारूच्या बॉक्स सह पाच लाख छप्पन्न हजार सातशे बारा रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सदर कार चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनोद यादव असल्याचे सांगितले, त्याचेकडे चौकशी केली असता त्याने वरील दारूच्या बाटल्या ह्या सणसवाडी येथीलच अमोल हंबीर याचेकडून आणले असल्याचे सांगितले.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ब्रम्हानंद पोवार रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विनोद आप्पा यादव रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे व अमोल हंबीर रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करीत आहे.

Previous articleनियम मोडणाऱ्या तीन दुकानदारांवर मंचर पोलिसांची कारवाई
Next articleलोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – उपमुख्यमंत्री अजित पवार