नियम मोडणाऱ्या तीन दुकानदारांवर मंचर पोलिसांची कारवाई

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मंचर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचे संसर्ग वाढू नये, म्हणून मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील मंचर शहर, केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र हे प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्रात विनापरवाना फिरणे, गर्दी जमवणे, दुकाने उघडी ठेवणे यासाठी बंदी असतानाही मंचर येथील काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडून दुकानासमोर ग्राहकांची गर्दी होईल असे वर्तन केले. तसेच कोरोना या संसर्गाचा प्रसार होईल असे वर्तन केल्याने तीन दुकानदारांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे.

आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मंचर शहर व परिसरात कुणीही बाहेर पडू नये किंवा बाहेर कोणीही गावात येऊन संचार बंदीचे उल्लंघन करू नये, गर्दी जमवू नये असे आदेश असतानाही मंचर येथे मंगळवार दि. १४ रोजी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस.व्ही.गवारी, पोलीस कॉन्स्टेबल एस.के.काळडोके, हे मंचर शहरात पेट्रोलिंग करत असताना एस.कॉर्नर येथे रमीझखान दिलदारखान पठाण (वय २८ ) यांनी आपले, राहील चिकन सेंटर हे दुकान उघडले होते. तर मंचर शहरातील डोबीमळा येथे सविता चंद्रशेखर कानसकर (वय ३९) यांनी आपले विघ्नहर जनरल स्टोअर हे दुकान उघडले होते.तर किशोर कैलास राक्षे (वय २२)रा.अवसरी बु.ता.आंबेगाव,पुणे यांनी आपले बाबा मिल्क हे दुकान उघडले होते. यांच्यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेश पालन न करणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.