प्रतिभा कोविड सेंटरला हॅपी ग्रुपची मदत

कोरेगावमुळ – यशोदा मंगल कार्यालय कोरेगावमूळ, इनामदार वस्ती येथिल प्रतिभा आरोग्य मंदिर कोविड सेंटर चालू झाल्यापासून रोज येथील रुग्णांना एक घास माणुसकीचा गोड व्हावा म्हणून हॅप्पी ग्रुप धड पडत आहे. किरण भंडारी मित्र परिवारा कडून यशोदा मंगल कार्यालयातील प्रतिभा कोविड सेंटरला चिकन बिर्याणी तसेच बिस्किट पुडे देण्यात आले.

 

यावेळी किरण भंडारी मित्र परिवार आणि हॅपी ग्रुपचे सर्व सदस्य दिलीप शितोळे, प्रशांत कोतवाल, शुभम काळे, भाऊसाहेब चौधरी, सागर निगडे, संकेत वाघ, कार्यालयाचे मालक अमोल भोसले उपस्थित होते.

येथिल रुग्णांना रोज गोड पदार्थ चिकन, अंडी, पाणी बॉक्स, गॅस सिलेंडर, बिस्कीटचे पुडे, फळं, मास्क सॅनिटायझर, टॉयलेट क्लीनर देण्याची पवित्र काम हॅप्पी ग्रुप करत आहे.

कोविड रुग्णांना आज पर्यंत मोतीचूर लाडू तुपातली जिलेबी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, ड्रायफूट रबडी, चिकन मसाला, चिकन बिर्याणी, अंडा मसाला, असे घरीही न मिळणारे जेवण हॅप्पी ग्रुप आनंदाने देत आहे असं अन्नदान पूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याच कोविड सेंटरला होत नसेल वेगवेगळ्या माध्यमातून गेले सात वर्ष एक व्हाट्सअपचा ग्रुप पुर्व हवेलीत उत्तम कार्य करत आहे. हॅप्पी ग्रुपच्या सर्व सदस्यांचा कार्य कौतुकास्पद आहे.

सर्व प्रकारे गरजु रुग्णांना सहकार्य करणाऱ्या हॅप्पी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार, रावलक्ष्मी फाऊंडेशन व ग्रामपंचायत कोरेगांवमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनिषा कड व ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड ,सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी, कर्मचारीवर्ग यांच्या वतीने विशेष ऋण व्यक्त करण्यात आले.

Previous articleप्रहार जनशक्ती पक्षाचे राजेगावमध्ये थाळीनाद आंदोलन
Next articleराज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार