प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेगावमध्ये थाळीनाद आंदोलन

दिनेश पवार,दौंड

केंद्र सरकारच्या कडधान्य आयात धोरणाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुक्याच्या वतीने टाळी-थाळी नाद आंदोलन करण्यात आले. देशात तूर शिल्लक असताना देखील आयात धोरण राबविण्यात येत आहे. तसेच,तुर, मुग,उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार याकरीता प्रहारचे टाली थाली आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदशना खाली दौंड तालुक्यालचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टाळी आणि थाळी वाजवून गणेश मंदीरा समोर राजेगांव येथे केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.


यावेळी दौंड तालुका युवा आघाडीचे उपाध्यक्ष अनिल आमनर , सुनिल जगताप , राजेंद्र कदम , भरत मोरे , आकाश मोरे , अक्षय नांगरे , सुरज ढमे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते .

Previous articleदौंड मधील युवकांनी केली अन्नदानाला सुरुवात
Next articleप्रतिभा कोविड सेंटरला हॅपी ग्रुपची मदत