माता पित्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण बंधूची कोविड केअर सेंटरला ५१ हजारांची मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

सामाजिक बांधिलकी जपत कोविड केअर सेंटरला मदतीचा ओघ सुरुच रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.रावसाहेबदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून संजय चव्हाण, अतुल चव्हाण आणि योगेश चव्हाण या बंधूनी त्यांचे वडील सुरेशराव चव्हाण व मातोश्री उषाताई चव्हाण यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी ५१,०००/- रूपयांचा धनादेश आमदार अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता अशोक पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

आपण केलेल्या या मदतीमुळे इतरही अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास आहे.

Previous articleकोरेगावमुळ येथे विशेष पोलीस अधिकाऱ्यांची गस्त
Next articleउरूळीत पोलीसांना सॅनिटायझरचे वाटप