उरूळीत पोलीसांना सॅनिटायझरचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

परिसरातील अन्य गावांमध्ये अहोरात्र जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या लोणी काळभोर पोलिस स्टेशन – उरुळी कांचन पोलिस दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्यासाठी गरज असलेल्या वस्तूंचे भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था पुणे यांच्याकडून नुकतेच वाटप करण्यात आले.

 

 

यामध्ये सॅनिटायझर, मास्क, हॅंडग्लोज व जनजागृती पोस्टर्स भेट देण्यात आले. भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था पुणे या संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे यांनी उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्याकडे या वस्तू सुपूर्त केले.

यावेळी उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्राचे दादाराजे पवार भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था पुणेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे व तंत्र अधिकारी दत्तात्रेय लोंढे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleमाता पित्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण बंधूची कोविड केअर सेंटरला ५१ हजारांची मदत
Next articleजुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक