कोरेगावमुळ येथे विशेष पोलीस अधिकाऱ्यांची गस्त

कोरेगावमुळ -कोरोना काळामध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता जनतेने घरीच थांबा आणि सुरक्षित राहा असा संदेश देऊन सुध्दा काही लोक ऐकत नाहीत. विना कारणास्तव सैरावैरा फिरत असतात. यासाठी ऊरुळी कांचन पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरिक्षक दादाराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावमुळ पंचक्रोषी गावामध्ये ड्रिम्स निवारा, आनंदवास्तु सोसायटी, कोरेगावमुळ, कोलतेवस्ती, बोधे काकडे वस्ती, इनामदार वस्ती, कांचन वृंदावन अशा विविध सोसायट्या व वाड्या वस्तीवर राञीचे पोलीसांबरोबर गस्त घालुन चोखपणे बंदोबस्त करण्याचे काम लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी नियुक्त केलेले विशेष पोलीस अधिकारी संजय साळवे, सुगत कांबळे,.रवि गायकवाड, अमोल गजरमल, प्रितम काकडे, आदित्य वाळेकर, प्रल्हाद काकडे, सोन्या कोळी, हितेश म्हलोञा, ऋषीकेश काकडे यांच्या मदतीने चांगल्या प्रकारे कार्य कोरेगावमुळ पंचक्रोषीमध्ये चालु आहे.

 शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य व्यवस्थितपणे चालु राहण्यास मदत होत आहे. गैरवर्तणुक करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

लोकांमध्ये चांगल्या प्रकारची दहशत व नियमांचे काटेकोर पालनाची शिस्त साहाय्यक पोलीस निरिक्षक दादाराजे पवार यांनी कोरेगावमुळ, उरुळी कांचन परिसरातील गावांना लावल्याचे वातावरण दिसत त्यामुळे या गोष्टींचे समाधान जनतेमध्ये दिसत आहे.

 

या मोहिमेत गावचे सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे तसेच पोलीस पाटील वर्षा कड, पोलीस मिञ संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, नवनियुक्त विशेष पोलीस अधिकारी जवानांचे फार मोठे सामाजिक कार्य म्हणुन योगदान आहे. यामुळे नक्कीच राञीच्या गस्तीमुळे भुरटे चोरी करणारे, बेशिस्तपणे वागणारे, आणि रहिवाशी असलेल्या ठिकाणी जमावाने एकञ येऊन मध्यप्राशन करणाऱ्या लोकांवर सुध्दा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे दादाराजे पवार यांनी सांगितले.

Previous articleकोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात
Next articleमाता पित्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण बंधूची कोविड केअर सेंटरला ५१ हजारांची मदत