मोटेवाडा येथील नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी आण्णा तांबे यांनी दिले २०० रॅपिड अँटिजेन किट

सचिन आव्हाड,दौंड- तालुक्यातील पाटस या गावातील मोटेवाडा परिसरातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी आण्णा तांबे यांनी स्वखर्चाने ६२ हजार रुपये किमतीचे २०० रॅपिड अँटिजेन तपासणी किट उपलब्ध करून दिले . यावेळी ८० नागरिकांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली . या तपासणीत २ जण कोरोना बाधित आढळून आले . तांबे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .

दौंड तालुक्यातील पाटस या गावात कोरोना या संसर्गजन्य व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेकजण मदतीसाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे . पाटस येथील मोटेवाडा परिसरातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आण्णा तांबे यांनी पुढाकार घेतला . स्वतः पैसे खर्च करून २०० कोरोना तपासणी किट खरेदी केले . या सर्व किट ची एकूण किंमत ६२ हजार रुपये इतकी आहे . या किट च्या सहाय्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोटेवाडा येथील ८० नागरिकांची कोरोना तपासणी केली . या तपासणीत २ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले .या उपक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुरेखा पोळ यांनी भेट दिली.तसेच नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवक भीमराव बडे , रुपाली ताठे , सुप्रिया गजरे आणि वाहनचालक प्रशांत खराडे हे उपस्थित होते .

मोटेवाडा येथील नागरिकांच्या कोरोना तपासणी उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी पाटस गावचे माजी सरपंच संभाजी खडके , आण्णा तांबे , ग्रामपंचायत सदस्य बाबसो कोळेकर , राजेश सोनवणे यांसह मान्यवर उपस्थित होते .

Previous articleनारायणगावात घरगुती गॅसचा काळाबाजार करणारा भामटा जेरबंद
Next articleनारायणगाव येथील ग्रामवैभव इमारतीच्या परिसरात अनधिकृतपणे उभारली टपरी