दौंड मध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका संभाजी ब्रिगेड व लाईन बॉईज ग्रुप दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहरातील अष्टविनायक बहुउद्धेशीय सभागृहात रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरास लाईन बॉईज ग्रुप व दौंड शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,राज्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, लॉकडाऊन परिस्थिती असल्याने सर्व कार्यक्रम बंद असल्याने रक्तदान शिबीर सुद्धा कमी प्रमाणात आयोजित केली जात आहेत, यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे,ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी योगदान म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलनाना पासलकर,लाईन बॉईज ग्रुप व संभाजी ब्रिगेड चे विद्यमान दौंड शहर अध्यक्ष गणेश भोसले,संभाजी ब्रिगेड दौंड तालुका अध्यक्ष कुलदिप गाढवे,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष विजय भोसले,नागेश्वर कन्ट्रकशन चे नागेशदादा बोबडे,युवा उद्योजक महेश देशमुख,लाईन बॉईज ग्रुप चे धीरज साबळे,राजेंद्र येवले ,अक्षय काळभोर,केतन वाघोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रमोद नाना देशमुख,विघ्नहर्ता हॉस्पिटल, शिवतेज मित्र मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleहोळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वन्यजिवांसाठी केली पाण्याची सोय
Next articleवयाच्या ७९ व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात