वयाच्या ७९ व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात

चाकण- कोरोनाची जास्त काळजी करू नका, घाबरून जाऊ नका, सर्वांत महत्त्वाचे सर्वांनी आयुर्वेदिक उपचार करा, मनाने खंबीर रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका.

कुटुंबातील प्रत्येकाने रोज ३० मिनिटे नियमितपणे व्यायाम, विशेष करून प्राणायाम करणे आवश्यक आहे, सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे”,
असा संदेश चाकण येथील श्री. एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. बाबुराव भवनबा आघाव यांनी दिला.

डॉक्टरांनी ९ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान केले, पण बेड उपलब्ध नसल्यामुळे मला घरीच स्वतंत्र रूममध्ये रहावे लागले, त्यानंतर मुलगा प्रा. प्रविण आघाव आणि सुनबाई प्राचार्या अर्चना या दोघांनी आय एम सी या स्वदेशी आयुर्वेदिक कंपनीच्या विविध प्रकारचे औषधांचा औषधोपचार केला. याने माझी ऑक्सिजनची पातळी वाढली, माझ्या छातीतील कफ आणि खोकला कमी झाला, माझ्याकडून रोज व्यायाम, प्राणायाम, जिना वर खाली करणे आणि चालण्याचा सराव करून घेतल्यामुळे माझा त्रास कमी होत गेला. थोडे दिवस टी व्ही आणि मोबाईल ठेवला.शेवटी १७ एप्रिल रोजी कोव्हिड सेंटर, आळंदी येथे खेड पंचायत समितीचे माजी सभापती श्री. अमृत नाना शेवकरी यांच्या प्रयत्नातुन बेड मिळाला, माझे वय ७९ वर्षे असल्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजन बेडला हॉस्पिटलमध्ये १५ दिवस निरीक्षणाखाली ठेऊन घेतले. पण माझी तब्बेत चांगली असल्यामुळे दिवसेंदिवस माझी शारीरिक ताकत वाढत गेली आणि कोव्हिड सेंटर, आळंदीच्या डॉक्टरांनी अभिनंदन करून घरी सोडले.

Previous articleदौंड मध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleबेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरक्षनाथ वाघ यांची निवड